बीड

बीडमध्ये जिल्ह्यात आजही 266 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2363 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 266 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2097 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 60 आष्टी 9 बीड 100 धारूर 4 गेवराई 18 केज 8 माजलगाव 35 परळी 15 पाटोदा 9 शिरूर 4 वडवणी 4

राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात 17 हजार 864 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 लाख 32 हजार 277 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 54 हजार 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात 9 हजार 510 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात आज 17864 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9510 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2154253 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 138813 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.77% झाले आहे