2000 हजाराच्या नोटा बंद होणार का?मोदी सरकारची सभागृहात माहिती
नवी दिल्ली, 15 मार्च : काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने 2016 साली नोटबंदी केली. त्याचवेळी अचानक 2000 हजार रुपयांच्या (Rs. 2000) नोटा चलनात आणल्या. या नोटा त्यावेळी खूप चर्चेत होत्या. दरम्यान आता या नोटांबाबत मोदी सरकारने मोठा खुलासा केला आहे. गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांच्या (Rs. 2000 currency note) नोटांची छपाई झालेलीच नाही. अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी झालेली असतानादेखील नोटांची छपाई करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांत 2000 रुपयांच्या नोटांची छपाई झालेली नाही.
एप्रिल 2019 पासून दोन हजार रुपयांच्या नोटांची प्रिटिंग बंद करण्यात आली आहे, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी याबाबत लोकसभेत लिखित उत्तर दिलं आहे.
30 मार्च 2018 ला 3362 दशलक्ष 2000 च्या नोटा होत्या तर 26 फेब्रुवारी 2021 रोजी 2000 रुपयांच्या नोटांची संख्या कमी झाली आहे. या कालावधीत 2499 दशलक्ष नोटाच होत्या. दोन वर्षांपासून दोन हजारांच्या नोटांची प्रिटिंग बंद आहे, असं त्यांनी सांगितलं.
दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी झाली आहे. या नोटा कमी प्रमाणात असताना त्यांचं प्रिटिंगही थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
2016 साली काळ्या पैसे आणि नकली नोटांना लगाम घालण्यासाठी सरकारने जुन्या 500 च्या नोटा बंद केल्या आणि 1000 रुपयांच्या नोटा पूर्णपणे हद्दपार केल्या. त्यानंतर 500 च्या नव्या नोटा चलनात आणल्या आणि एक हजार रुपयांच्या नोटांऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. या नोटांसह 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणल्या.