ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील सर्व नियमावली अधिक कडक:नव्या गाइडलाइन्स लागू-ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई, 15 मार्च : राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात असताना राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. यानुसार यापुढे राज्यातील सर्व नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या 15 हजारांहून अधिक आढळत असल्याने ठाकरे सरकारने कडक कारवाई करण्याचं आदेश दिले आहेत.

1- राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल.

याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणं ही बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आलं आहे.

2 याशिवाय शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.

3 महत्त्वाचं म्हणजे राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

4 लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात 20 पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.