बीड

निष्काळजीपणा भोवला: अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बाकी बंद

बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर प्रतिबंद घालण्यासाठी प्रशासनाने आधीपासून सूचना दिल्या होत्या मात्र यावर नागरिकांनी निष्काळजीपणा दाखवला त्यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पान टपरी इत्यादी पूर्णत: बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

18 मार्च पासून जिल्ह्यातील सर्व मंगलकार्यालय फंक्शनहॉल अनिश्‍चित बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, सर्व अत्यावश्यक किराणा, दुध विक्रेते आणि औषधालये वगळून दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करेल, असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.

काय सुरु, काय बंद?

1) बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहतील. हॉटेलमध्ये कोरोना नियमांचं पालन करावं.
2) जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर 18 मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद
3)जिल्ह्यातील फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांनी मास्क लावून फळविक्री करावी. जो नियम मोडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
4) सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक
5)जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापने , दूध विक्रेते दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. (मेडिकल सेवा वगळून)

जिल्ह्यातील अनेक दुकानदार, व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने दिला आहे.