बीड

बीडमध्ये आकडा पुन्हा वाढला: जिल्ह्यात आज 181 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1691 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 181 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1510 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 33 आष्टी 18 बीड 82 गेवराई 12 केज 12 माजलगाव 5 परळी 7 पाटोदा 2 शिरूर 5 वडवणी 5

शुक्रवारी महाराष्ट्र राज्यात 15 हजार 817 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 झाली आहे. आज राज्यात 11 हजार 344 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 21 लाख 17 हजार 744 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79 % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,10,485 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत दरम्यान राज्यात आज 56 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.