बीड

बीडला कोरोनाचे शतक: जिल्ह्यात आज 163 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1717 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 163 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1554 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 27 आष्टी 4 बीड 100 धारूर 1 गेवराई 9 केज 1 माजलगाव 8 परळी 7 पाटोदा 2 शिरूर 3 वडवणी 1

गुरुवारी दिवसभरात राज्यात तब्बल १४ हजार ३१७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. तसेच, ५७ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे.

गेल्या २४ तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण करोनाबाधितांची संख्या आता २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे. त्यापैकी १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ९२.९४ टक्के इतका आहे. पण दुसरीकडे सातत्याने वाढणारी बाधितांची संख्या चिंतेत भर टाकू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, गुरुवारच्या ५७ मृत्यूंसोबत आता राज्यातल्या मृतांचा आकडा देखील वाढून ५२ हजार ६६७ इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर २.३२ टक्के इतका आहे.

राज्यातील 8 जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली – देशातील काही राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज पत्रकार परिषद घेत देशभरातील करोना परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे.

या पत्रकार परिषदेत जी माहिती समोर आली आहे ती महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण असलेल्या टॉप 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे – 18,474, नागपूर – 12,724, ठाणे – 10,460
मुंबई – 9,973, अमरावती – 5,259, जळगाव – 5,029
नाशिक – 4,525, औरंगाबाद – 4,354