बीड अंबाजोगाईत धक्कादायक आकडेवारी जिल्ह्यात आज 185 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1407 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 185 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1222 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 42 आष्टी 16 बीड 85 धारूर 1 गेवराई 12 केज 7 माजलगाव 13 परळी 5 शिरूर 1 वडवणी 3
राज्यात 13,659 नवे कोरोना रुग्ण सापडले
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनीही मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, असा सूचना सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. परंतु राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. राज्यात आज 13,659 नवे कोरोना रुग्ण सापडले आहे, त्यामुळे नागरिकांची चिंताही वाढलीय. आता कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंत एकूण संख्या 22,52,057 झालीय.
राज्यात आज 9,913 रुग्ण बरे होऊन घरी परतले
सध्या राज्यात 99,008 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.राज्यात आज 9,913 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण 20,99,207 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.21% एवढे झालेय. आज राज्यात 13,659 नवीन रुग्णांचे निदान झालेय. राज्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीय.
२४ तासांत देशभरात २२ हजार ८५४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसागणिक भारतामध्ये वाढत आहे. दरदिवसाला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशभरात २२ हजार ८५४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत १८ हजार १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत देशभरात १२६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी १२ लाख ८५ हजार ५६१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी ९ लाख ३८ हजार १४६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.