बीड जिल्ह्यात उपचार घेणार्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली
बीड-15 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होती अनेक तालुक्यात ही संख्या निरंक असताना आता जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे,नागरिकांची बेफिकरी आणि नियम पायदळी तुडवत कोरोना गायब झाल्याची समज घेत सार काही चालू झालं आणि उपचार घेणारी हीच संख्या 438 वर पोहचली आहे
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता दिवाळी नंतर रुग्ण संख्या घटली होती शासनाने काही नियम अटी घालून पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत करण्याची परवानगी दिली होती मात्र कोरोना गायब झाल्याचा समज करून घेत नागरिक बेफिकरीने वागू लागले तोंडाला मास्क,हात धुणे,गर्दी टाळणे हे साधे नियम देखील कुणी पाळले नाहीत काही लोक तर मास्क घालणे पाप समजतात असे म्हणून वागू लागले
परिणामी नकळत पसरत असणारा कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला,वर्ष भर ज्यांनी काळजी घेतली त्यांनाही आता कोरोनाने ग्रासले जाऊ लागले आहे,प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियम लावून कागद काळे करण्याचे काम केले परंतु नियम तोडणाऱ्या वर कुठलीही कारवाई झाली नाही भाजी मंडई,बाजार,गर्दीच्या रस्त्यावर कुठेही नियमावली सुरू नव्हती आरोग्य प्रशासन तर कोरोनाचा कंटाळा आल्यागत काम करत होत,अधिकारी बदलले की नियम देखील बदलतात असेच झाले आहे,
आज जिल्ह्यात 438 रुग्ण उपचार घेत आहेत,त्यात बीड शहरातील संख्या अधिक आहे 250 च्या वर रुग्ण बीडमधील आहेत त्या पाठोपाठ अंबाजोगाई येथे 141 आष्टी येथे 39,माजलगाव येथे 12 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत आज 43 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत जिल्ह्यात आतापर्यत 588 लोकांनी जीव गमावला आहे,19638 इतकी बाधित संख्या झाली आहे तर त्यात 18569 जण कोरोनामुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात 1183 रुग्ण उपचार घेऊ शकतात इतकी व्यवस्था करण्यात आहे,
प्रशासनाने आत्ताच खबरदारी म्हणून नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई केली नाही तर रुग्ण वाढीचा धोका संभवतो
सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे विनाकारण अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यायला हवी,कोरोनाची भीती वाटत नसेल तर लसीची भीती का बाळगावी असा प्रश्न पडतो आहे,किमान 70 %सुरक्षा तरी मिळेल हा विचार नागरिकांनी करायला हवा,