महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात आज आकडा वाढला:आढळले तब्बल 95 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 820 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 95 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 725 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 7 आष्टी 9 बीड 38 धारूर गेवराई 9 केज 1 माजलगाव 6 परळी 14 पाटोदा 1 शिरूर 7 वडवणी 3

राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले.

गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

आज राज्यात तब्बल ८ हजार ९९८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आणखी ६० जणांना करोनामुळे आपले प्राण गमवाव लागला आहे. दरम्यान, नवीन बाधित आणि करोनामुक्तांच्या संख्येतील फरक वाढत चालल्याने ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ८५ हजारपार गेली आहे.

दरम्यान, आज ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. १७ हजार ५२२ इतके रुग्ण हे पुणे जिल्ह्यात तर राज्यात ८५ हजार १४४ इतकी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे.

आतापर्यंत एकूण २० लाख ४९ हजार ४८४ करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.६६ टक्के एवढे झाले आहे. तर, कोरोना संसर्गाने राज्यात ५२ हजार ३४० जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.३९ टक्के एवढा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा अधिक वाढत चालल्याने नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागातर्फे केलं जात आहे.