पालख्या डोंगराला वनवा,तरूणांनी आग आणली आटोक्यात.
गेवराई तालुक्यातील घटना. शंभर फुटावरील वनक्षेत्र वाचले.
गेवराईः प्रतिनिधी
उन्हाळ्याला प्रारंभ होऊ लागल्याने डोंगराळ भागातील हिरवळ कमी होऊ लागली आहे.दरम्यान डोंगराला वनवा लागण्याच्या घटना देखील या काळात वाढत असतात दि.३ बुधवार रोजी गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आगीचे लोट ऊसळताच परिसरातील नागरीक व तरूणांनी घटना स्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली.या आगीमध्ये जवळपास तीस ते चाळीस एकर क्षेत्रा वरील झाडे जळून गेली.
गेवराई तालुक्यातील मध्य भाग अधिकतर डोंगराळ भागाने व्यापलेला आहे.यात सर्वात मोठा असणारा पालख्या डोंगर बुधवारी आगीच्या भक्षस्थानी पडला या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते ओम कडपे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मदतीसाठी परिसरातील तरुणांना व्हॉट्स ॲप द्वारे मॅसेज करून मदतीसाठी आव्हान केले. तरूणांनी सोशल मिडीयावर व्हायरल झालेला मॅसेज पाहताच डोंगराकडे धाव घेतली , काही वेळातच डोंगर मानसाच्या गर्दीने फुलला येथे आलेला प्रत्येक व्यक्ती आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता अथक परिश्रमांतून पाच तासानंतर हि आग आटोक्यात आणली.नागरिकांच्या व तरूणांच्या प्रयत्नांमुळे डोंगरावरील हजारो वृक्षानां व वन्यजीवांना जिवदान देऊन गेले आहे. दुपारच्या वेळी पालख्या डोंगराला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते
१०० फुटांवर वनक्षेत्र.
आग लागलेल्या ठिकाणापासून अवघ्या शंभर फुटावर वनक्षेत्राचा प्रारंभ होता ही आग लवकरच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची भावना निसर्गप्रेमी ओम कडपे व तरुणाकडून या वेळी व्यक्त करण्यात आली नागरिक व वनविभागाच्या मदतीने वनक्षेत्र वाचले गेले आहे. यावेळी, वनरक्षक श्री गाडे, नवनाथ जाधव, बबन कडपे, सरपंच रमेश नेहरकर, अर्जुन देवकते, सोमनाथ कडपे, नवनाथ कडपे, ओम कडपे व इतर तरुणांनी परिश्रम घेतले.
बालग्राम ची मदत
गेवराई येथे शहरापासून जवळच असलेल्या बालग्राम अनाथालयातील विद्यार्थ्यांनी आग विझवण्यासाठी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन मोठी मदत केली असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी बालग्राम अनाथालयाची मोठी मदत यावेळी झाली असल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
डोंगरावर खंडोबा देवस्थान आहे त्यामुळे येथे दूरवरून लोक दर्शन करण्यासाठी येत असतात. परंतू या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने काही कॉलेज तरूण तरूणी पण या ठिकाणी फिरण्यासाठी येत आहेत तसेच बाहेरील तरुण दारू पिण्यासाठी मज्जामस्ती करण्यासाठी येत असतात आणि यातीलच कोणीतरी आग लावली असावी असा संशय आहे. याठीकणी अशी जोडपी येत असल्याने येथील महिलांना व मुलींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर पोलिस व प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ओम कडपे यांनी केली आहे.