बीड

बीड जिल्ह्यात आज आढळले 52 कोरोना पॉझिटिव्ह तर 48 जण कोरोनामुक्त

बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 794 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 52 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 742 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज 48 जण कोरोनामुक्त झाले आहेत सध्या 330 जण उपचार घेत आहेत

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 13 आष्टी 2 बीड 17 गेवराई 3 केज 4 माजलगाव 8 परळी 1 पाटोदा 2 शिरूर 2

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. मागील २४ तासांत राज्यात ८ हजार २९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ५५ हजार ७०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५२ हजार १५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यातील ३ हजार ७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के एवढे झाले आहे. तसेच सध्या राज्यातील मृत्यूदर २.४२ टक्के एवढा आहे.