बीड

बीड जिल्ह्यात दहावी-बारावी वर्ग वगळता सर्व शाळा दहा मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 13 मार्च 2020 पासून निर्गमित केलेल्या आदेशानुसार नियमावली राबवली जात आहे या कार्यालयात 29 जानेवारी च्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू करण्यात आलेले आहेत

बीड जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते बारावी वर्ग सर्व नियमांचे पालन करून टप्प्याटप्प्याने सुरक्षितपणे सुरू करण्यात आलेले आहेत मात्र सध्या बीड जिल्ह्यात covid-19 बाधित रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे आतापर्यंत काही शाळांमधील 28 शिक्षक दोन शिक्षकेतर कर्मचारी आणि सहा विद्यार्थी असे 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच दिनांक 10 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेले आहेत