बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज आढळले 39 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 431 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 39 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 392 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 17 बीड 12 धारूर 1 गेवराई 1 केज 3 परळी 2 शिरूर 3

गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले

राज्यात गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले आहेत.
तर 24 तासांत 2417 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आज 35 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत एकूण 21,00,884 रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 51788 रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच राज्यात आतापर्यंत 19,94,947 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या राज्यात 52,956 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागानं दिली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशीही वाढ झाली असून रविवारी १४२६४ नवे रुग्ण आढळले व ९० जण मरण पावले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण १.३२ टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो १.४२ टक्के झाले आहे.