ऑनलाइन वृत्तसेवापुणे

जिल्ह्यात लॉक डाऊन नाही;पण कडक नियम:200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न,राजकीय कार्यक्रम

पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नियंत्रित संचार राहिल, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश देऊन कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

ठळक मुद्दे

*जिल्ह्यात लॉक डाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी

*200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम

*रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)

*हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा

*मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा

*जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करा

*नमुना तपासण्यांची संख्या वाढवा

  • मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा
  • नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे