बीड जिल्ह्यात आज 30 कोरोना पॉझिटिव्हची:अंबाजोगाई बीड शहरात रुग्ण वाढ
बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 421 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 30 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 391 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 9 आष्टी 4 बीड 9 धारूर 2 गेवराई 2 केज 2, माजलगाव 1 शिरूर 1
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 5427 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 2543 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ कमी होत होती. पण आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्य़ाने राज्यातील प्रशासन चिंतेत आहे.
सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वांरटाईन असून 1743 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.48 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 95.5 टक्के झाला आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,81,520 झाली आहे.
तर 40,858 रुग्ण अजूनही राज्यात एक्टीव्ह आहेत.