कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 28 कोरोना पॉझिटिव्हची भर
बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 425 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 397 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 14 बीड 4 केज 1,माजलगाव 3 परळी 5 शिरूर 1
काल महाराष्ट्र राज्यात 3663 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवीन 2700 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1981408 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 37125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.66% झाले आहे.
देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 610 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 09 लाख 37 हजार 320 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 06 लाख 44 हजार 858 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 805 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 36 हजार 549 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात 100 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 913 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.42 टक्के एवढा आहे. देशात आतापर्यंत 89 लाख 99 हजार 230 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 9 लाख 16 हजार 568 जणांना लस टोचण्यात आली आहे त्याखालोखाल महाराष्ट्रात 7 लाख 19 हजार 371 जणांना टोचली आहे.