बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 19 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 316 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 297 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 6 आष्टी 1 बीड 7 केज 1, परळी 3 शिरूर 1

राज्यात आज देखील उच्चांकी रुग्ण वाढ झाली. दिवसभरात राज्यात 3 हजार 365 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच, 3 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 78 हजार 708 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी आज 3 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात काल 3365 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3105 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1978708 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 36201 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7% झाले आहे.#CoronaVirusUpdates

राज्यात सध्या 36 हजार 201 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 95.70 टक्के एवढा झाला आहे. राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर व नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.