बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 26 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 450 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 26 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 424 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 9 आष्टी 6 बीड 9 माजलगाव 1परळी 1

राज्यात आज (शनिवार) देखील मागील २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या कोरनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. राज्यभरात ३ हजार ६११ नवे करोनाबाधित वाढले असून, १ हजार ७७३ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय ३८ रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ६० हजार १८६ वर पोहचली आहे.
याशिवाय राज्यात आतापर्यंत १९ लाख ७४ हजार २४८ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) आता ९५.८३ टक्के झाले आहे. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३३ हजार २६९ असून, आजपर्यंत ५१ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

देशात गेल्या २४ तासांत आणखी १२ हजार १४३ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी, आठ लाख,९२ हजार, ७४६ वर पोहोचली आहे. तर १.६ कोटीहून अधिक जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

करोनामुळे आणखी १०३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख, ५५ हजार, ५५० वर पोहोचली आहे. करोनातून आतापर्यंत एक कोटी, सहा लाख, ६२५ जण बरे झाले आहेत त्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.३२ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. मृत्युदर १.४३ टक्के इतका आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १.५ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या एक लाख, ३६ हजार, ५७१ उपचाराधीन रुग्ण आहेत.