बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 19 कोरोना पॉझिटिव्ह तर 24 जणांना डिस्चार्ज

बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 482 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 463 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यात 192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 18105 बाधीत संख्या झाली असून 17342 जण कोरोना मुक्त झाले आहेत आतापर्यंत 562 रुग्ण दगावले आहेत बीड जिल्ह्यात 95.78% बरे होण्याचे प्रमाण आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 5 बीड 7 गेवराई 2 केज 1 परळी 2 शिरूर 2

राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या २४ तासात ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत ५१ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.