बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 25 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 587जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 562 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 3 आष्टी 7 बीड 6 परळी 2 पाटोदा 6 शिरूर 1

कोविड रूग्णांची संख्या 10 हजाराच्या खाली

नवी दिल्ली – गेल्या 24 तासात देशात एकूण 9110 इतके नवीन कोविड 19 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोविडग्रस्तांची संख्या या महिन्यात दुसऱ्यांदा दहा हजाराच्या खाली आली आहे. आज लागोपाठ चौथ्या दिवशी कोविडमुळे मरण पावलेल्यांची संख्या 100 च्या खाली राहिली आहे.

दरम्यान करोनामुक्त रूग्णांची संख्या आता 1 कोटी 5 लाख 48 हजार 521 इतकी झाली असून रिकव्हरीचा हा रेट आता 97.25 टक्के इतका झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज सकाळी ही माहिती देण्यात आली.

कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.43 टक्के इतके कायम आहे. सध्या देशात एकूण 1 लाख 43 हजार 625 सक्रिय कोविड रूग्ण आहेत. कोविड चाचण्याही सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असून काल दिवसभरात एकूण 6 लाख 87 हजार 138 जणांच्या कोविड चाचण्या घेण्यात आल्या.