ऑनलाइन वृत्तसेवा

पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : पुढील आठवड्यात दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे पुढील सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बँकांचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचा संप पुकारला आहे. पुढील आठवड्यात 15 आणि 16 या दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात 14 तारखेला रविवार आला असल्याने या दिवशी बँकेला अधिकृत सुट्टी असते.

आज हैदराबादमध्ये झालेल्या UFBU च्या मीटिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आला. या मीटिंगनुसार बँकांचं खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत 15 आणि 16 अशा दोन दिवस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या United Forum of Bank Unions (UFBU) यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. IDBI आणि LIC मधील व्यवहारातून 2019 पासूनच खासगीकरणाला सुरुवात झाली आहे. UFBU च्या बैठकीत जनरल सेक्रेटरी सी एच व्यंकटचलम म्हणाले की, बँकाचं खासगीकरण करण्यासंदर्भात सरकारचा विरोध केला जात आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात बँक क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बँकांचे काम याच आठवड्यात पूर्ण करावे लागणार आहे.