बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 49 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 589 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 49 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 540 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 14 आष्टी 2 बीड 9 गेवराई 1केज 5, परळी 15 शिरूर 2 वडवणी 1

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) आज ७,०३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,४३,३३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५८% एवढे झाले आहे. आज राज्यात २,९९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२% एवढा आहे.

देशात मागील 24 तासांत 11 हजार 039 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या देशात 1 लाख 60 हजार 057 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 07 लाख 77 हजार 284 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 04 लाख 62 हजार 631 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 14 हजार 228 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.