कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 21 कोरोना पॉझिटिव्ह तर 38 जण कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 542 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 521 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बीड जिल्ह्यात आज 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
आता पर्यंत 17857 इतकी बाधित संख्या झाली असून 17079 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत 554 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे सध्या जिल्ह्यात केवळ 213 रुग्ण उपचार घेत आहेत
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 3 बीड 12, केज 3, माजलगाव 2 परळी 1
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात २४ तासात २,५८५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तसेच नवीन १,६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १९,२९,००५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ४५,०७१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.१९ टक्के झाले आहे.
गेल्या 24 तासात भारतात 13,052 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 127 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 13,965 नवे नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 1,07,46,183 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,68,784 झाली आहे. एकूण 1,04,23,125 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,54,274 पोहचला आहे. आतापर्यंत देशात 37,06,157 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.