बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 728 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 26 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 702 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 3 आष्टी 2 बीड 9, गेवराई 4 केज 2 धारूर 1 परळी 1 शिरूर 3 माजलगाव 1

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) शुक्रवारी २,६१३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,२५,८०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२८% एवढे झाले आहे. आज राज्यात २,७७१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४४,९६,३५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,२१,१८४ (१३.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९५,१२७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 13,083 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 137 लोकांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासात 14,808 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,07,33,131 झाली आहे. आतापर्यंत 1,04,09,160 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 1,54,147 लोकांचा जीव घेतला आहे. अनेक लोक कोरोनावर मात करत असून देशात 1,69,824 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.