बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 892 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 847 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 9 आष्टी 4 बीड 21, गेवराई 1 केज 1 परळी 9

राज्यातील करोना संसर्ग अद्याप सुरूच असून मंगळवारी
कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. मंगळवारी २ हजार २०४ नवे कोरोना रुग्ण दाखल झाले. कोरोनामुळे राज्यात ४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख १३ हजार ३५३ वर पोहोचली आहे.
राज्यात ४३ हजार ८११ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८६२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात २ हजार १०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १७ हजार ४५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 06 लाख 89 हजार 527 एवढी झाली आहे.
सध्या देशात 1 लाख 76 हजार 498 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 3 लाख 59 हजार 305 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.गेल्या 24 तासांत देशभरात 137 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 53 हजार 724 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.