लोकांक्षा न्यूज पोर्टलवर 10 लाख व्हिजिटरची भेट
बीड-खरोखरच आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्यासाठी हा अनमोल प्रसंग आहे अल्पावधीतच लोकांक्षा न्यूज पोर्टल जिल्हयातील वाचकाबरोबर राज्यात देशात आणि देशा बाहेर असणाऱ्या आपल्या वाचकांच्या हातात पोहचले आजच 10 लाख व्हिजिटर टप्पा पार झाल्याचे पाहून खूप समाधान वाटले
डिजिटल मीडियात प्रवेश करण्यापूर्वी लोकांक्षा प्रिंट मीडियात होता असंख्य वाचक आवर्जून मागणी करत होते पण प्रिंट मीडियात पैसा आणि मनुष्यबळ लागते ते देण्यास आम्ही कमी पडलो योगायोगाने लॉक डाऊन च्या काळात डिजिटल मीडिया ची कल्पना सुचली आणि न्यूज पोर्टल सुरू केले प्रत्येक वाचकांच्या हाती म्हणजे प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईल मध्ये लोकांक्षाने प्रवेश केला अर्थात हे वाचकांचे प्रेम अधिक वाढत गेले सर्वसामान्य लोकांना आवश्यक असलेली जी माहिती हवी ती खात्री करून देण्याचा प्रयन्त आम्ही केला रोजच्या जीवनात रोज आवश्यक लागणारी माहिती गरजेची ठरली ती असंख्य वाचकांनी देखील स्वीकारली लोकल बातम्या साठी अनेक वृत्तपत्र आहेतच आम्ही मात्र ते टाळले अनेकांचा आग्रह असतानाही आम्ही लोकल बातम्या घेऊ शकलो नाहीत यासाठी स्थानिक वृत्तपत्रे आहेत हे देखील आम्ही सांगितले आणि ते अनेकांनी मान्यही केले
थोड्या कालावधीत म्हणजे 10 महिन्यात 10 लाख व्हिजिटर होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्या तमाम वाचकांचे आम्ही कायम ऋणी आहोत
लोकांक्षा न्यूजचे 10 व्हाट्स अप ग्रुप,3 ब्रॉडकास्ट ग्रुप व आम्ही राज्यातील ज्या ज्या ग्रुपमध्ये आहोत अशा 143 ग्रुपमध्ये व टेलिग्राम बीड जिल्हा बातम्या आणि प्रसिद्ध असलेल्या डेलीहंट व फेसबुकवर लोकांक्षाची प्रत्येक बातमी पोहचते हा विस्तार आम्हाला या संख्येपर्यंत घेऊन गेला आहे लोकांक्षा वृत्तपत्र शासनमान्य तर आहेच पण आता न्यूज पोर्टल देखील गुगलच्या अधिकृत यादीत पोहचले आहे व्यवसायाच्या दृष्टीने हेही खूप महत्वाचे ठरले प्रत्येक बातमीचे अपडेट सम्पूर्ण माहितीसह देत असताना अनेकांची मदत मिळते त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि ज्या 10 लाख वाचकांनी लोकांक्षा न्यूज पोर्टल ला भेट दिली त्यांनाही धन्यवाद
असेच प्रेम कायम ठेवून आपण तर वाचक आहातच पण आपल्याबरोबर इतरांनाही लिंक पाठवून सहकार्य करावे हीच या क्षणी विंनती
आपलाच
संपादक
प्रशांत सुलाखे-लोकांक्षा बीड