कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 742 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 50 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 692 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 12 आष्टी 2 बीड 16, केज 6 माजलगाव 1 परळी 3 शिरूर 10
बीड जिल्ह्यात 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 17549 इतकी बाधित संख्या झाली आहे तर 16744 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आतापर्यंत 551 रुग्ण दगावले आहेत सध्या 240 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.41% इतका आहे आतापर्यंत 1लाख 92 हजार 374 लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यात 1 लाख 74 हजार 825 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत
राज्यात शुक्रवारी २,७७९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,०३,६५७ झाली आहे. राज्यात ४४,९२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,६८४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे.
तर ३,४१९ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत एकूण १९,०६,८२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के एवढे झाले आहे.