कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज फक्त 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 442 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 405 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अंबाजोगाई 5 आष्टी 3 बीड 17 धारूर 1 गेवराई 2 केज 1 माजलगाव 1 परळी 1पाटोदा 3 शिरूर 2 वडवणी 1
राज्यात दिवसभरात 3,500 जण कोरोनामुक्त
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात शुक्रवारी दिवसभरात 3 हजार 500 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.78 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 145 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.54 कर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 36 लाख 84 हजार 589 चाचण्या झाल्या असून 19 लाख 84 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 851 जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 204 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
देशातील कोरोनाची स्थिती
गेल्या 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 05 लाख 27 हजार 683 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 01 लाख 62 हजार 738 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.त्यापैकी 15 हजार 975 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 191 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 51 हजार 918 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.53 टक्के एवढा आहे.