बीड जिल्ह्यासाठी 17640 कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
अखेर जी लस येण्याची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली पहिल्या टप्यात दिली जाणारी लस बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली असून 17640 इतके डोस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे दि 16 जानेवारी पासून आता 6 ठिकाणी लसीकरण होणार आहे
बीड जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना लसीकरण करण्यासाठी जवळपास साडे सतरा हजार कोव्हिड लसीची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे नोंदवलेली होती त्यानुसार बीड जिल्ह्यासाठी कोव्हिड लसचे 17640 डोस उपलब्ध झाले आहेत या कोव्हिड लसीचे डोस संध्याकाळपर्यंत बीड येथे येणार आहेत आजच औरंगाबाद विभागासाठी देण्यात येणार्या कोव्हिड लसीचे आगमन औरंगाबाद या ठिकाणी झाले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पुढचे नियोजन स्पष्ट होईल असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे.