पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया:पहिल्या टप्प्यात 5300
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबकण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकारांशी बोलताना केली.
पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्करित जागा या दुसऱया टप्प्यात भरण्यात येतील. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱयांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसारच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.