बीड जिल्ह्यात आज 30 कोरोना पॉझिटिव्ह तर 25 रुग्णांना डिस्चार्ज
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 505 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 30 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 475 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.काल 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 16 हजार 192 कोरोना मुक्त झाले आहेत तर 17 हजार 39 बाधीत संख्या झाली आहे यात 540 जणांचा मृत्यू झाला आहे
आज दि 9 रोजी आलेल्या अहवालात
अंबाजोगाई 5,आष्टी 6 बीड 13,धारूर 1 केज 3 परळी 2, रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?
राज्यात ३,६९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,६१,९७५ झाली आहे. राज्यात एकूण ५१,८३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
शुक्रवारी २८९० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,५८८,९९९ करोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के एवढे झाले आहे.