ऑनलाइन वृत्तसेवा

जातिअंतर्गत लग्न केल्यास ब्राम्हण वधूला मिळणार 25 हजाराची आर्थिक मदत व 3 लाखाचा बॉण्ड

कर्नाटक राज्याच्या ब्राह्मण विकास महामंडळाने जातिअंतर्गत लग्न केल्यास वधूला आर्थिक मदत देण्याचे जाहीर केली आहे. अरुंधती आणि मैत्रेयी नावाने ही योजना असून यामुळे गरीब ब्राह्मण मुलींना आर्थिक मदत देण्याचा उद्देश आहे. अरुंधती योजनेअंतर्गत वधूला 25 हजार रुपये देण्यात येतील तर पुजारी, पुरोहित यांनी लग्न लावून दिल्यास वधूला 3 लाख रुपयांचे बॉन्ड मिळतील. अरुंधती योजनेसाठी सरकारने गरीब कुटुंबातील 550 वधूंची नावे या योजेनेसाठी निवडण्यात आली आहे. तर मैत्रेयी योजेनेतून 25 गरीब कुटुंबांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

अटी आणि नियम

महामंडळाचे संचालक एच एस सच्चिदानंद मुर्ती म्हणाले की लाभार्थ्यांना काही नियमांचे पाल्न करावे लागेल.

या योजनेसाठी वधूचे कुटुंब गरीब असणे गरेजेचे आहे, त्यासाठी तसे प्रमाणपत्रही त्यांना सादर करावे लागेल. या योजनेसाठी वधूचे पैले लग्न आणि इतर शर्तीचा समावेश आहे. तसेच इच्छूक लोकांनी महामंडळाच्या वेबसाईटवर आपले नाव नोंदवू शकता असे आवाहन मुर्ती यांनी केले आहे.