पॅनकार्डलाआधारशी लिंक न केल्यास होऊ शकतो मोठा दंड
नवी दिल्ली : आधार कार्ड एक अतिशय आवश्यक सरकारी कागदपत्र आहे. तर पॅनकार्डचे सुद्धा खुप महत्व आहे. मोदी सरकारच्या निर्देशानुसार, पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आता यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत वेळ दिला आहे. जर लिंकिंग 31 मार्च 2021 पर्यंत केले नाही तर इन्कम टॅक्स अॅक्ट अंतर्गत गंभीर परिणामांतर्गत तुमच्यावर 10000 रुपयांचा दंड सुद्धा लागू शकतो.
सीबीडीटीने म्हटले आहे की, जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत आहेत, त्यांच्यासाठी पॅनकार्डला आधार जोडणे अनिवार्य आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या आधार योजनेला संविधानिक दृष्ट्या वैध केले होते.
अशाप्रकारे करा पॅनला अधारशी लिंक
- सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा. तेथून लिंक आधार वर क्लिक करा.
- नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा. खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.
- सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
- लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.
याशिवाय, पॅन सेंटरमध्ये जाऊन सुद्धा आधारला पॅनकार्डशी लिंक करता येऊ शकते. यासाठी 25 रुपयांपासून 110 रुपयांपर्यंत आणि पॅनकार्ड व आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी लागते.