बीड जिल्ह्यातील तीस गावात पूर्णवेळ संचारबंदी
तीस गावात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावर
बीड/प्रतिनिधी
जिल्ह्यातील गेवराईत इटकुर आणि माजलगाव तालुक्यात हिवरा येेथे प्रत्येकी एक असे कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले असून या परिसरात तीन किलोमीटर अंतरात असलेल्या तीस गावात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार जाहीर केले आहे
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात इटकुर येथे एक माजलगाव तालुक्यात हिवरा येथे एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या गावच्या परिसरात असलेल्या काही गावांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेवराई तालुक्यातील इटकुर,हिरापूर, शिंपे गाव कुंभारवाडी खामगाव नांदूर हवेली पारगाव जप्ती हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे तर पुढील चार किलोमीटर परिसरात गेवराई तालुक्यातील लोळदगाव अकोटा शहाजानपुर चकला मादळमोही कृष्णा नगर पाडळसिंगी टाकळगाव व बीड तालुक्यातील आहेरचिंचोली कामखेडा पेंडगाव हिंगणी हवेली तांदळवाडी हवेली व पारगाव शिरस ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे
माजलगाव तालुक्यातील नऊ गावे अनिश्चित काळासाठी बंद
माजलगांव तालुक्यातील हिवरा बु. या गावापासून ३ कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील हिवरा बु., गव्हाणथडी , काळेगांवथडी, डुब्बाथडी व भगवाननगर
हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कंटेंटमेंट झोननंतर पुढील ४
कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील राजेगांव, सुर्डी, महातपुरी, वाघोरा, व वाघोरातांडा ही गांवे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत ही सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारवंदी लागू करण्यात आली आहेत. या सर्व गावांमध्ये अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद ठेऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत