ऑनलाइन वृत्तसेवा

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया ५ डिसेंबरपर्यंत:१२ डिसेंबरला अंतिम यादी

मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे थांबलेली पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले असून, ५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर, १२ डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख १७ हजार जागांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ९५ हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला
यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून अर्ज भरण्याची मुभा मिळाली. ९७ हजार विद्यार्थ्यांपैकी ७३ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयात याचिका असल्याने प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता सरकारने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी निर्णय घेतला आहे.

४०, ४५ टक्क्यांवर मिळणार प्रवेश

राज्यात पॉलिटेक्निक, फार्मसी पदविका प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमात इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना आता ४० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांवर प्रवेश मिळणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राजपत्र काढले आहे.