दिल्लीत खासदारांसाठी भव्य इमारत;3 बेडरूमसह अत्याधुनिक बाथरूम,सेंसर, गार्डन
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : लोकसभेच्या खासदारांना राजधानी दिल्लीमध्ये येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी नवीन टोलेजंग इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रर मोदी यांंच्या हस्ते करण्यात आले. संसद भवनाच्या नजीक असलेल्या डॉक्टर बी डी मार्ग येथे जुने बंगले तोडून आधुनिक सुविधांनी युक्त नवीन खासदारांसाठी इमारत बांधण्यात आले.
7 फेब्रुवारी 2018 रोजी या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. जवळपास दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून यासाठी 218 कोटी रुपयांची निधी देण्यात आला होता. मात्र, 188 कोटी रुपयांमध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
जवळपास 3 बेडरूमचे हे निवासस्थान 4 हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे.
तीन इमारतींना मिळून जवळपास 76 फ्लॅट तयार करण्यात आले आहे. प्रत्येक इमारतीच्या वर टेरेस गार्डन तयार करण्यात आला आहे. पर्यावरण पूरक अशा या इमारती असून फ्लायद्वारे निर्मित विटांच्या माध्यमातून बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
सोबतच प्रत्येक इमारतीवर सौर ऊर्जा यंत्र लावण्यात आली असून अतिशय कमी वीज यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांची नावे या तिन्ही इमारतींना देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे उद्घाटन करताना स्पष्ट केले की,’संसद भवनाच्या जवळ या इमारती असून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे अनेक खासदारांची घराची अडचण दूर होणार आहे. प्रत्येक खासदाराकडे येणाऱ्या मतदारसंघातील लोकांसाठी देखील इमारतीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या इमारतीमध्ये पूजास्थळ, अत्याधुनिक किचन, 3 बेडरूम यामध्ये एक मोठे बेडरूम, दोन ड्रॉईंग हॉल, एक गेस्टरूम, खासदाराचे कार्यालय, अत्याधुनिक बाथरूम, इमारतीमध्ये सेंसर, गार्डन अशा प्रकारच्या सुविधा खासदारांना मिळणार आहे.