महाराष्ट्रमुंबई

आज रात्री 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार:महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

मुंबई, 22 नोव्हेंबर : दिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आज रात्री 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यावेळी लॉकडाउन किंवा वीज बिल सवलतीबद्दल काय घोषणा करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ते काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेनंही राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करता का हे पाहण्याचे ठरणार आहे.

दुसरीकडे 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहे. पण, स्थानिक पातळीवर महापालिकांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. नागपूर, पुण्यात कोरोनाची परिस्थिती वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेता का, हेही पाहण्याचे ठरणार आहे.