बीड

बीड जिल्ह्यात 72 कोरोना पॉझिटिव्ह:20 शिक्षकांचा समावेश

कालपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्याही कोरुना चाचण्या सुरू झाल्या असून आज आलेल्या अहवालात 72 जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामध्ये 20 शिक्षकांचा समावेश आहे

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1896 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 72 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1824 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला

आज दि 21 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 5 बीड 19, गेवराई 3 ,केज 6,माजलगाव 32,परळी 4,शिरूर 2, वडवणी 2 रूग्ण सापडले आहेत.

23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार ठिकाणी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरु झाल्या आहेत बीड जिल्ह्यातील 2476 शिक्षकांच्या टेस्ट घेण्यात आल्या असून त्यामध्ये 20 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 1244 जणांचे प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे

राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावी वर्गापर्यंत च्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असून येत्या 23 नोव्हेंबर पासून या शाळा सुरू होणार आहेत बीड जिल्ह्यातील बीड अंबाजोगाई परळी प्रत्येकी 3 गेवराई तालुक्यात 7 तर केज आणि शिरूर मध्ये 2 शिक्षकांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोणा चाचण्या सुरू झाल्या आहेत अकरा तालुक्यातील 2476 शिक्षकांच्या कोरोणा चाचण्या सुरू करण्यात आल्या असून आतापर्यंत वीस शिक्षक पॉझिटिव आढळून आले आहेत