बीड

तीन जिल्हे जोडणाऱ्या 110 कोटीच्या रस्त्याचा प्रस्ताव दाखल-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

आर्वी-अशिया विकास निधी अंतर्गत रामा 211 विहामांडवा नवगाव आपेगाव महंत टाकळी चकलांबा निमगाव आर्वी पाडळी तागडगाव रायमोह गारमाथा या दोन पदरी नॅशनल हायवे चा 44 किलोमीटरसाठी 110 कोटी रुपयाचा डीपीआर सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव यांच्याकडे पाठवला असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले

आर्वी तालुका शिरूर येथे पाडव्यानिमित्त श्री स्वामी समर्थ आपले सेतु सेवा केंद्र शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून करण्यात आली. यावेळेस त्यांनी शिरूर तालुक्यातील नॅशनल हायवे ची चालू प्रस्तावित कामे प्रगतीपथावर असले बाबत सांगितले.

आपले सरकार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व डिजिटल फोटो स्टुडिओ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पुढे बोलत असताना सेवा डिजिटल जोडणी बरोबरच रस्त्याची जोडणी पण महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.रस्त्याच्या चालू कामांची कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर सेतू सेवा केंद्र सुविधाही राम युगातील लंका सेतु समान असले बाबत ते बोलले. सत्तेची संधी मिळाल्यावर ग्रामीण भागातील दळणवळण वाढवण्याबाबत जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले.


आपल्या भाषणामध्ये प्रमुख्याने त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक मधून आर्वी तरडगव्हन गाजीपुर 416 लक्ष , खरवंडी येळंब आर्वी खलापुरी नवगण राजुरी 37 किमी साठी 177 कोटी ,हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत राजुरी रायमोह शिरूर चिंचपूर 149 कोटी ही कामे चालू असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
सर्वसामान्यांच्या प्रमुख गरजा वीज पाणी सडक याबाबत बोलत असताना पुढे त्यांनी ते 33 केव्ही सब स्टेशन ब्रम्हनाथ येळंब, रायमोह , खलापुरी ,फुलसांगवी, खोकरमोह येथील कामांचा उल्लेखही त्यांनी केला.


त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील जलसंधारण विभागामार्फत मंजूर केलेल्या 36 कोटी रुपयाच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची काम पूर्णत्वास जात असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
अशिया विकास निधी अंतर्गत रामा 211 विहामांडवा नवगाव आपेगाव महंत टाकळी चकलांबा निमगाव आर्वी पाडळी तागडगाव रायमोह गारमाथा या दोन पदरी नॅशनल हायवे चा 44 किलोमीटरसाठी 110 कोटी रुपयाचा डीपीआर सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले


शेती पूरक उद्योग दूध उत्पादन वाढवण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केले. रायमोह आणि शिरूर येथे लवकरच बँकेच्या शाखा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाचा समारोपात त्यांनी परिसरातील सर्व तमाम जनतेला पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या,पुढे त्यांनी दीपक नागरगोजे यांच्या शांतीवन येथे भेट देऊन वृक्ष लागवड करून त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक बाप्पू खांडे शिरूर पंचायत समितीच्या सभापती सौ उषाताई सरवदे, इंडो इस्राईल ऍग्रो इंडस्ट्रीज मुंबई चे अध्यक्ष भुसारे शांतीवन चे अध्यक्ष दीपक नागरगोजे शिवसेनेचे नेते अरुण भोसले शिवसेना तालुकाप्रमुख किरण चव्हाण,अंकुश नाना उगले, संतोष कंठाळे ,प्रकाश भाऊ इंगळे ,अशोक इंगळे गोरख सानप, शोभा सरवदे ,शेख बाबा बापू गाडेकर, गणेश घोलप , बिबन शेख, विठ्ठल गात शिरपूर सरपंच, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव पंढरीनाथ उगले पाटील, बाळू गात , नवनाथ ढाकणे सरपंच बावी बाळू आप्पा, शहाजी भोसले सरपंच आर्वी, भरत भांगे ,अजिनाथ जोगदंड, रमेश तांबारे, युवा उद्योजक बाबू खोपडे ,बलभीम फरताडे, सुनील भोसले आणि आर्वी ग्रामस्थ उपस्थित होते.