महाराष्ट्रमुंबई

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना 12 नावांचा प्रस्ताव, दोन नावाबाबत उत्सुकता

मुंबई : महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यांरी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली.अजूनही या नावांमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश आहे हे उघड करण्यात आले नाही नावाबाबत अजूनही गुप्तता पाळण्यात आली आहे

आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. या यादीनुसार राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि नितीन बानगुडे यांना राज्यपाल नियुक्त सदस्यपदी संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय काँग्रेसने सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन आणि गायक अनिरुद्ध वनकर यांना संधी देऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांनी सांगितलं.शिवसेनेकडून आणखी दोन नावे कोणती याबाबत उत्सुकता आहे विभागवार संधी देण्यात आली तर मराठवाडयातून नेमके कोण असेल हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच ठरवणार आहेत

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. “राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील,” असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

“राज्यपाल यादी मंजूर करतील की, नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी व्यक्त केली.