राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा
मुंबई/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्य मानले जात आहे. राज्य सरकारची पावलेही त्याच दिशेने पडत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली. यात 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चौथ्य टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, हे लॉकडाऊन कसे असेल हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत 975 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या संदर्भात महाविकास आघाडीतील महत्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याविषयी चर्चा झाली. याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पण सध्या तरी लॉकडाऊन वाढवण्यावर सरकारचा भर असल्याची चिन्ह आहेत.