पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली:उद्यापासून विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
मुंबई, 19 ऑक्टोबर : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. पण, महाराष्ट्रावर आलेले हे अस्मानी संकट आणखी कायम राहण्याचे चिन्ह आहे. 20 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात वीजांच्या गडगडाटासह अनेक भागात पाऊस पडणार असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं दिला आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक भागात पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबई आणि आसपास भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज कमी आहे.
पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज तर मराठवाड्यासह बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अद्याप परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. तत्पूर्वी सध्या हा पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. परत पुढील काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस असल्याने महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होणार आहे, असे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. सोलापूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत