पीएफधारक खातेदारांच्या बँक खात्यामध्ये व्याजाचा पहिला हप्ता जमा होणार
कर्मचारी भविष्य निधी कार्यालय दिवाळीपर्यंत पीएफधारक खातेदारांच्या बँक खात्यामध्ये व्याजाचा पहिला हप्ता जमा करणार आहे. आतापर्यंतच्या जमा पीएफ रक्कमेवरील ८.५० टक्के दराने हे व्याज मिळणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची जाणार आहे. ईपीएफओच्या ६ कोटींपेक्षा जास्त कामगारांना याचा फायदा मिळणार आहे.
कोरोनाच्या संकट काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांना हा मोठा दिलासा आहे. ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाची सप्टेंबरमध्ये बैठक झाली होती. यावेळी कामगारांच्या खात्यातील जमा रक्कमेवरील यंदाच्या ८.५० टक्के व्याजाचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. दुसऱ्या हप्त्यात ०.३५ टक्के आणि तिसऱ्या हप्त्यात ०.३५ टक्के दिले जाणार आहेत. कोरोना काळात २५ मार्चपासून आतापर्यंत पीएफ खात्यातून ३८ लाख ७१ हजार ६६४ कर्मचाऱ्यांनी ४४ हजार ५४.७२ कोटी रुपये काढले आहेत.