बीड

बीड जिल्ह्यात 78%रुग्ण बरे झाले आज 151 पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यात (दि.5 ) रोजी जिल्ह्यात 151जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1011 स्वॅब तपासण्यात आले. यात 860 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2241 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 15, आष्टी 15, बीड 57, धारूर 11, गेवराई 4, केज 8 माजलगाव 28,परळी 11, पाटोदा 3,शिरूर 4 आणि वडवणी 5,असा रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 10736 बाधीत रुग्ण संख्या असून 7921 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 77.71 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 299 रुग्ण दगावले आहेत