शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार-ना अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षणात असणाऱ्या होमिओपॅथीच्या मागण्या मंजूर कराव्यात-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक पॅथी नंतर होमिओपॅथीला देखील आता महत्त्व प्राप्त झाले आहे आयुष मंत्रालय आणि केंद्राच्या योजना राबवण्यासाठी राज्यसरकारचा सहभाग राहील होमिओपॅथीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होईल असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे
बीड येथे स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाचे माजी संचालक स्व अनिल भाटिया यांच्या पुण्यतिथी निमित्त सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय बीड व होमिओपॅथिक शिक्षण आणि रिसर्च इंस्टिट्युट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑन लाईन वेबीनार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,
स्व.काकूंच्या पुण्यतिथी कार्यक्रमानंतर सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय बीड व होमिओपॅथिक शिक्षण आणि रिसर्च इंस्टिट्युट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.04 ते रविवार दि.11 ऑक्टोबर 2020 या दरम्यान सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत एक आठवड्याचे ऑन लाईन वार्षिक वेबीनारचे आयोजन करण्यात आले असून या वेबीनारचे उदघाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना अमित देशमुख यांचे हस्ते करण्यात आले यावेळी माजीमंत्री तथा आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव जयदत्त क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग, आमदार विक्रम काळे,काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड कालिदास थिगळे,उपस्थित होते,
प्रारंभी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर व मान्यवरांच्या हस्ते स्व काकू आणि स्व डॉ अनिल भाटिया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रास्ताविक डॉ अरुण भस्मे यांनी केले, दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्रात होमिओपॅथीला राजाश्रय मिळाला पाहिजे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरू करावे, महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे होमिओपॅथी महाविद्यालय असणे गरजेचे असून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी देखील त्यांनी केली
होमिओपॅथी एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ किशोर मेहता यांनी वेबिनार सप्ताहाचे आयोजनाचे उद्देश सांगितले व श्रीमती केशरकाकू क्षीरसागर व स्वर्गीय डॉक्टर अनिल भाटिया यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली तसेच सात दिवसाच्या वेबिनार मध्ये सहभागी होणाऱ्या वक्त्यांची माहिती दिली,या वेबीनारमध्ये डॉ.सुभाष सिंग, डॉ.अजित कुलकर्णी, डॉ.धवल मोदी, डॉ.प्रविण, डॉ.बी.टी.रूद्रेश डॉ.अन्वर अन्सारी, डॉ.मितीश कोठारी, डॉ.सतीश गाला यांची भाषणे होणार आहे हे सांगितले
यावेळी पुढे बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले कि,स्व केशरकाकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऑनलाइन वेबिनार मध्ये मला सहभागी होता आले याचा आंनद होत आहे,स्व काकू आणि स्व विलासराव देशमुख यांचे घनिष्ठ संबंध होते,स्व काकूंच्या राजकीय वाटचालीचा मराठवाड्याला खूप मोठा फायदा झाला आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी पहिले होमिओपॅथी कॉलेज बीडमध्ये सुरू करून सामान्य विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे, लवकरच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरू होतील असेही ते म्हणाले
कोरोना संक्रमनाच्या या काळात आयुष मधील डॉक्टरांनी काय उपायोजना कराव्यात याबद्दलची अडव्हायझरी शासनाच्या टास्क फोर्सने तयार केली व ती परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली त्यामुळे कोरोनाच्या आजारावर उपचार करता येतील,
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मराठवाड्यातील आणि विशेषता बीड जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळाले पाहिजे या विचारातून होमिओपॅथीचे शिक्षण स्वर्गीय काकूंनी बीडमध्ये उपलब्ध करून दिले गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ग्रामीण भागात असणारा विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन पुढे गेला पाहिजे या उदात्त विचाराने सुरू केलेल्या होमिओपॅथी कॉलेजमधून हजारॉ विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत याचा खूप अभिमान वाटतो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीने अनेक दुर्धर आजारावर उपचार होऊ शकते हे आता सिद्ध झाले आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणात असणाऱ्या होमिओपॅथीच्या या मागण्या आहेत त्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करून सध्या कोरोनाच्या काळात होमिओपॅथी उपचार सुरू केले ते नक्कीच दिलासादायक ठरले आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले,यावेळी आ विक्रम काळे म्हणाले कि, स्वर्गीय काकूंनी मोठा विचार करूनच बीड सारख्या ठिकाणी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू केले आहे शेतकरी कुटुंबातला मुलगा सुद्धा डॉक्टर व्हावा हा उदात्त हेतू त्यांचा होता बीडसह मराठवाडा आणि महाराष्ट्रातही होमिओपॅथीचे आगळे वेगळे स्थान निर्माण करून दिले आहेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत स्वर्गीय काकूंच्या नंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे देखील काकुंचा वारसा पुढे चालवत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो
यावेळी डॉ रामजी सिंह म्हणाले कि, वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथीचे शिक्षण देऊन प्रचार व प्रसार करावा यासाठी स्वर्गीय केशरकाकूंनी जे कार्य केले ते होमियोपॅथी क्षेत्र कधीच विसरणार नाही सामान्य विद्यार्थी देखील वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतो हे स्वर्गिय काकूंनी केलेल्या कार्यावरून आज दिसत आहे महाराष्ट्रात आयुषच्या योजना राबविण्यास सरकार कमी पडत आहे सांगितले,होमिओपॅथी ला राजाश्रय मिळविण्यासाठी वयाचा विचार न करता आमरण उपोषण केले परंतु सरकारने विशेष दखल घेतली नाही असेही ते म्हणाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उत्तरेश्वर पाचेगावकर यांनी केले
तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ महेंद्र गौशाल यांनी केले,कार्यक्रमास डॉ हृदरेश सदस्य बोर्ड ऑफ गव्हर्नर सीसीएच सर्व वक्ते डॉ गणेश पांगारकर उपप्राचार्य माजी उपप्राचार्य डॉ महेश गोलेकर डॉ सुरेश नांदल डॉ विरेंद्र कवीश्वर व देश परदेशातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली