बीड जिल्ह्यात आजही 193 बरे झाले तर 200 पॉझिटिव्ह रुग्णांची भर
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिवचा आकडा बघता बघता 10000 पार झाला आहे असे असले तरी एकूण रुग्ण संख्येच्या 75% बरे होण्याचे प्रमाण हे दिलासादायक आहे आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमातून आणि रुग्णसेवेत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे व डॉक्टरांचे निदान व योग्य उपचार जिल्ह्यातील रुग्णांना बरे होण्यासाठी उपयुक्त ठरू लागले आहे
बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असताना नागरिकांनीदेखील याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे सध्या खुल्या बाजारात मास्क न वापरता आणि कुठलेही नियम न पाळता दिसणारे नागरिक हे स्वतःला आणि दुसऱ्यालाही कोरोनाच्या विळख्यात ओढू लागले आहेत जिल्हा प्रशासनाने यावर आता कडक कारवाई करणे गरजेचे आहे
बीड जिल्ह्यात (दि.2 ) रोजी जिल्ह्यात 200 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 804 स्वॅब तपासण्यात आले. यात 604 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2241 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 24, आष्टी 28, बीड 62, धारूर 13, गेवराई 15, केज 12, माजलगाव 12,परळी 8, पाटोदा 11,शिरूर 8 आणि वडवणी 7,असा रूग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात एकूण 10236 बाधीत रुग्ण संख्या असून 7701 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2241 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 75.23 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 294 रुग्ण दगावले आहेत