बीड

बीड जिल्ह्यात 31 ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊनची नियमावली

बीड जिल्ह्यात 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहित्या चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असून आज जे आदेश लागू आहेत ते आदेश 31 ऑक्टोबर पर्यंत लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत

कंटेनमेंट झोन मध्ये 19 मे व दिनांक 21 मे 2020 नुसार जिल्ह्यात तयार करण्यात येत असलेले कंटेनमेंट असून पुढील आदेश येईपर्यंत कायम राहतील केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेनमेंट तयार करण्याबाबत दिलेल्या सूचना या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील असे आदेशात म्हटले आहे

बीड जिल्ह्यात प्रतिबंधित म्हणजेच बंद असणारे ठिकाणे खालील प्रमाणे

सर्व शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था प्रशिक्षण शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील तथापि ऑनलाईन दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल चित्रपटगृहे जलतरण तलाव करमणूक उद्याने थेटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स), ऑडिटोरियम असेंबली हॉल यासारखे तत्सम ठिकाने बंद राहतील सर्व सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजन शैक्षणिक संस्कृती धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या लोकसंख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम परिषदा पूर्णपणे प्रतिबंधित असणार आहेत यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी पूर्व क्षेत्र सुरू राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशात संलग्न राहतील आणि सदर आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अस्तित्वात राहतील

खालील ठिकाणांना सशर्त परवानगी

हॉटेल, फूड, रेस्टॉरंट आणि बार दिनांक 5 ऑक्टोबर 2020 पासून स्थापनेच्या क्षमतेच्या 50% क्षमते पर्यंत व स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील
सदर अस्थापना सुरु करण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेने बाबत पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणार्‍या वाहनांचा हालचालीस राज्यात व राज्याबाहेर कोणत्याही प्रकारे वेळेचे बंधन असणार नाही यापूर्वी देण्यात आलेल्या परवानगी क्रिया बाबी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे चालू राहतील बंदी या देशातून सूट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनांमध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्णवेळ मास्क वापरणे बंधनकारक असून व सुरक्षित अंतर आदी बंधने पाळणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे covid-19 साठी शासनाने दिलेले आदेश व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत