भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावं आहेत.
भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली. या नव्या कार्यकारिणीमध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातले चार तरुण चेहरे यामध्ये आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे
गेल्या वर्षी निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं वृत्त सातत्याने येत होतं. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आलेलं होतं. मात्र आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे.
विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण 13 जणांना National Secretary म्हणून नेमण्यात आलं आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रालते 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत.
याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेतेम म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.