बीड

बीड जिल्ह्यात 178 बरे झाले तर आज 192 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात (दि.26) रोजी जिल्ह्यात 192 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 870 स्वॅब तपासण्यात आले. यात 678 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2405 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 31, आष्टी 22 , बीड 54, धारूर 10, गेवराई 10, केज 14, माजलगाव 17,परळी 18, पाटोदा 6,शिरूर 4 आणि वडवणी 6 ,असा रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 9195 बाधीत रुग्ण संख्या असून 6535 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2405 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 69.62 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 255 रुग्ण दगावले आहेत