महाराष्ट्रवृत्तसेवा

कोरोना रुग्ण वाढू लागले ‘या’ शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

नागपूर, 26 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशाची उपराजधानी नागपूरमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

‘नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा ‘रिकव्हरी रेट’ जास्त दिसत आहे, पण संक्रमण खूप जास्त वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने या शनिवारी आणि रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे’, असं नागपूरचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आ
शहरातील कोविड-19 चा धोका वाढत असतानाच संक्रमणाची साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या काही लोकांमुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. कोरोनाची साखळी खंडीत व्हावी, नागरिकांनाही शिस्त लागावी यासाठी दोन दिवसांच्या जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे, असं संदीप जोशी यांनी सांगितले.